अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मंगरुळ येथे वाहन क्र.एम.एच.२३ एन. ५५४१ च्या चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व वाहन कडेला जाऊन फसले.फसलेले वाहन काढण्यासाठी मंगरुळ येथिल नागरिक मोठ्या संख्यने जमले.त्यात भाजपा युवमोर्चाचे राकेश पाटील,युवसेना जिल्हा उपप्रमख श्रीकांत पाटील,पोलिस पाटील भगवत पाटील,अनिल पाटील यांनी वाहन काढण्यास मदत सुरु केली.तेव्हा गाडीत गायी कोंबले असल्याचे दिसले.हे
वाहन चालकाला समजताच तो अचानक तेथून पळून गेला.युवकां नी कोंबलेल्या गायी बाहेर काढल्या तेव्हा तेथे हेडावे येथिल गोकुळ पाटील आले व त्यांना त्यांची गाय ची ओळख पटली. घटनास्थळी पोलिसउपनिरीक्षक राहुल लबडे,पोलिस योगेश महाजन पोहचले.गुरे शिरूळ गोशाळेत रवाना केली.वाहन पोलिस स्टेशनला जमा केले. गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस स्टेशन ला वाहनचालका विरुद्ध गुन्हयाची नोंद करण्यात आली. पुढिल तपास हेडकोंस्टेबल भरत ईशी करत आहे.







