जळगांव:- २२ मार्चपासून कोरोना व्हायरस मुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात पूर्णतः लॉक डाउन करण्यात आला असून, राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र जळगांव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेवून चोरून लपून पण बिनधास्त अनेक ठिकाणी बेकायदा देशी दारु, गावठी दारु विक्रीचे प्रकार समोर येत आल्याने आता अशी विक्री करणा-यावर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी रिपाइंचे आयटीसेल जिल्हा प्रमुख मिलिंद तायडे वयानी केली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र जळगांव जिल्ह्यातील शहर व ग्रामिण भागातीत बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यावी, अशी विक्री करणा-यांवर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात यावा.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधित अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध जोरदार कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार जळगांव जिल्हातील शहर व ग्रामीण भागात दारू पुर्णतः बंद या साठी शीघ्र उपाययोजना करण्यात यावी.
वारंवार गुन्हा करणारे व अशा कृत्याच्या पाठीमागे असलेल्या सर्व संबंधीत लोकांवर जरब बसविण्यासाठी अशा लोकांच्या मुसक्या आवळुन दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए. सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याची तयारी सुरु करण्यात यावी असेही तायडे यांनी म्हटले आहे.