औरंगाबाद – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावातील धक्कादायक खून प्रकरणाचा छडा लावण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाना अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा गंगापूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी सचिन पंडित आणि पप्पू बुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक सुरवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

काय आहे प्रकरण?
गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावातील गणेश मिसाळ हा युवक मागील वर्षी बेपत्ता झाला होता. त्यांनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी संशयावरुन सचिन पंडित याकडे चौकशी केली असता. त्याने खून प्रकरणाची कबुली दिली. आरोपी सचिन पंडित याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती गणेश मिसाळ याला मिळाली होती. यानंतर गणेश मिसाळचा अनैतिक संबंधाना अडथळा होऊ नये म्हणून सचिन पंडितने त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावातील एका शेतात पुरला.
सचिन पंडित याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. गंगापूर पोलिसांनी यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं गणेश मिसाळला पुरलेल्या ठिकाणी खोदकाम केले. या ठिकाणी मृत मिसाळ याचा सांगाडा आढळून आला. गंगापूर पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
गणेश मिसाळ खून प्रकरण गंगापूर पोलिसांनी सचिन पंडित आणि पप्पू बुट्टे या दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. एका वर्षानंतर बेपत्ता झालेल्या गणेश मिसाळ याचा खून झाल्याचे उघड झाल्यामुळे गावात खळबळ माजली.गंगापूर पोलीस ठाण्याचे अशोक सुरवसे यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.







