पाचोरा (प्रतिनिधी) – भजनसम्राट ह. भ. प. स्व. विठोबा अ. मरवडे सामाजिक प्रतिष्ठान, रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय “काव्यभूषण गौरव पुरस्कार सन – २०२० ” गोंदेगाव येथील भूमिपुत्र आकाश दिपक महालपूरे यांना नुकताच देण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मरवडे यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ऑनलाइन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण केले. भजनसम्राट ह. भ. प. स्व.विठोबा अ. मरवडे सामाजिक प्रतिष्ठान, रायगड तर्फे दरवर्षी समाजप्रबोधन, साहित्य, कला, क्रिडा, संस्कृती, विज्ञान, संगीत आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तीस वा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
वैचारिक मांडणी समाजात करत असलेल्या साहित्यातील अनमोल कार्यामुळे आकाश महालपूरे हे प्रसिद्ध साहित्यीक आहे. नुकतचं त्यांना आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडल साहित्यरत्न पुरस्कार व समाजभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. आकाश महालपुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









