पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी “अँनिमियामुक्त भारत” अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दादाभाऊ चौधरी उपस्थिती होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब मंत्रालयाने सुरू केलेल्या या अभियानाचे महत्व व उद्देश उपस्थितांना समजवून सांगितले. डॉ. सुनील गवळी यांनी अभियान कशा प्रकारे राबवावे जेणे करून रुग्ण कमी होतील या बाबत मार्गदर्शन केले.







