मुंबई (वृत्तसंथा) – महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावरून भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी या कायद्याचं स्वागत करत सरकारला भेदभाव न करण्याचं सूचवलं आहे.

‘महाराष्ट्र सरकार ‘शक्ती’ हा नवीन कायदा आणत असल्याचा मला आनंद आहे. दिशा या कायद्याचे नाव बदलून शक्ती असे करण्यात आले आहे. या कायद्यानुसार राज्य सरकार केवळ निवडक गुन्ह्यांसदर्भातच कारवाई करणार नाही, तर एखादे तरुण कॅबिनेटमंत्री संशयित असतील, तर त्यांच्यावरही कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी आशा व्यक्त करुयात,’ असे ट्विट करत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टोला लगावला आहे.
प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र, पदेशातून आल्याने सरनाईक विलगीकरणात होते. आज ते ईडीसमोर हजर झाले. दरम्यान, ‘टॉप ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक एम शशिधरन यांना सोमवारी रात्री मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली स्थानबद्ध करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी आज संगितले. याप्रकरणी ‘ईडी’ने पूर्वी सरनाईक यांचे साथीदार अमित चंडोल यांना अटक केली आहे.







