कोलकत्ता (वृत्तसंथा) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या गाडीवर आज दगडफेक करण्यात आली. नड्डा हे निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. डायमंड हार्बर भागात आज त्यांची प्रचार सभा होती. सभेसाठी जात असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली.

जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. आज नड्डांच्या दौऱ्याचा अंतिम दिवस होता. डायमंड हार्बर भागात आज जेपी नड्डा यांची आज प्रचार सभा होती. सभेसाठी या भागाकडे येत असताना त्यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे आरोप भाजपने केला आहे. परंतु, हे आरोप तृणमूल पक्षाने फेटाळून लावले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशातच या राज्यात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. जेपी नड्डा आज डायमंड हार्बरमध्ये रॅलीला संबोधित करणार होते. डायमंड हार्बर पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदार संघ आहे.
दरम्यान, जेपी नड्डा यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीचे पश्चिम बंगला सरकारकडून उत्तर मागितले आहे. याबाबत राज्य सरकारला पत्रही पाठविण्यात आले आहे.







