जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनास महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पाठींबा दिला होता. या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन केले.


आज सकाळी साडेदहाच्या सुमारास टॉवर चौकातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा सुरू केला. हा मोर्चा सुभाष चौक, सराफ बाजार, रथ चौक, बोहरा गल्ली आदी मार्गांवरून गोलाणी मार्केट परिसर आणि चित्रा चौकात आला. यात ठिकठिकाणी जे दुकाने, प्रतिष्ठाने वा हातगाड्या उघड्या दिसल्या त्यांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी या मोर्चात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बसपा, बहुजन मुक्ती मोर्चा, लोकसंघर्ष मोर्चा, एमआयएम आदी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शिवसेना महानगर प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, सचिन धांडे, मनियार बिरादरीचे फारूख शेख, अशोक लाडवंजारी, वाय. एस. महाजन, दिव्या भोसले, सलीम इनामदार, ममता तडवी, मुफ्ती हारून, शिवसेनेच्या मंगला बारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव शहर जिल्हा
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात पास केलेल्या जाचक कायद्यांमुळे त्रस्त असणारा हिंदुस्थानचा शेतकरीवर्ग रस्त्यावर उतरलेला आहे गेले काही दिवस सातत्याने अहोरात्र आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचे होरपळत आहे केंद्र शासनाला अर्थात मोदी सरकारला याचे काही सोयरसुतक नाही त्यामुळे शेतकरी बंधूच्या ह्या चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणूनआज एक दिवसाचा भारत बंद पुकारला आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय पवार साहेबांनी या आंदोलनाला संपूर्ण समर्थन देऊन पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे , शिवसेनेचे तसेच काँग्रेस व इतर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सगळ्याचे समर्थन मिळण्यासाठी व्यापारी बंधूंना विनंती करीत आहेत या विनंतीची दखल घेऊन व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने संपूर्णपणे बाजारपेठ बंद केली आहे कडकडीत बंद पाळण्यात आला.








