यावल ( प्रतिनीधी) – यावल / रावेर तालुक्यातील आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि जि.प गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे विजय पाटील, शिवसेनेचे कडूभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने २० सप्टेंबर रोजी संसदेत तीन कृषी कायदे मंजूर केल्याने दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी मागील बारा दिवसांपासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे आणि त्यासाठी ८/१२ रोजी भारत बंद पुकारण्यात आला. भारत बंद यशस्वी होण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे यावल येथे भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठनेते हाजी शब्बीरखान, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिरखान, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करिम मण्यार, बोदडे , हाजी गफ्फार शाह, अमोल भिरुड, संदीप सोनवणे, काँग्रेससेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, अ. जा. जिल्हा. उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, देवकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष धोबी, नगरसेवक समीर मोमीन,सागर देवांग, हसन तडवी, कामराज घारू, सेवा फौंडेशनचे शहराध्यक्ष नईम शेख, अनिल जंजाले, बशीर तडवी, मोहसीन भाई, हितेश गजरे, गणी भाई,सकलेंन शेख, विक्की पाटील,राहुल बारी, विक्की सोनवणे, प्रवीण पाटील,समाधान पाटील, आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







