चोपडा;- तालुक्यातील धनवडी येथे एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, मुरलीधर आत्माराम पाटील (वय-५५) रा. धनवाडी ता. चोपडा जि. जळगाव हे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते घरात एकटेच राहत होते. ६ डिसेंबर रोजी घरात कोणीही नसतांना लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी कुटुंबियांच्या लक्षात आला. शहर पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर जवागे करीत आहे.