नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरिकेत कोरोनाने चक्क हाहाकार माजवला आहे. चीननंतर आता अमेरिका ही कोरोनाचे केंद्रबिंदू ठरली आहे. अमेरिकेत चीनपेक्षाही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबरीने करोनाने संपूर्ण जगात आपली पावले पसरविली आहे. मात्र, नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात 2018 मध्ये आलेल्या एका कोरियन वेब सीरिजमध्ये कोरोना व्हायरबाबत उल्लेख असल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सवर 2018 मध्ये रिलीज झालेल्या My Secret Terrius या वेबसीरिजमध्ये एक जीवघेण्या विषाणूबद्दल सांगण्यात आलं होतं. सध्या या वेब सीरिजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर बोलताना दिसत आहे की, मोर्टेलिटी रेट 90 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी काही लोक अशाप्रकारचा जीवघेणा व्हायरस बनवत आहेत. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर या वेब सीरिजमध्ये 2 वर्षांपूर्वीच कोरोनाची भविष्यवाणी करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. सोशल मीडियावर सध्या #ChineseVirus19 ट्रेंड करत आहे. या वेबसीरिजचा हा व्हिडीओ शेअर करुन लोक या व्हायरसच्या भविष्यवाणी विषयी बोलताना दिसत आहेत. मात्र या व्हिडीओचं कोणतंही व्हेरीफिकेशन अद्याप मिळालेलं नाही