अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर पोलीस स्टेशनला महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन पोलीस निरीक्षक मोरे यांनी केले. त्यावेळी सोबत सहपोलीस निरीक्षक परदेशी, पी एस आय वाघ, पी एस आय शिंदे, पी एस आय लबडे, गोपनीय अमलदार डॉ. शरद पाटील व सर्व अमलदार दीपक विसावे, भटुसिह तोमर, हितेश चिंचोरे, दीपक माळी, रवी पाटील, सचिन पाटील, सुनील शिंदे, आलोक साबळे व सर्व सहकारी उपस्थित होते.