अमळनेर (प्रतिनिधी ) – येथील खा.शि.मंडळाच्या जी.एस.हायस्कूलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रतिमा पुजन करून साजरा करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक कुलकर्णी यांनी भारतीय संविधान यावर मार्गदर्शन केले.व लॉकडाउन नंतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबंचे चरित्र कसे वाचले जाईल यावर भर देण्यास सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एल.मेखा, उपमुख्याध्यापक करस्कार, जेष्ठ शिक्षक बी.एस.पाटील, के.पी.पाटील , कलाशिक्षक डि.एम.दाभाडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते.








