जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय परीक्षा एनसी न्यू दिल्ली द्वारा घेण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग नेट परीक्षेत विखरण (एरंडोल) येथील सुनील अहिरे यांनी यश संपादन केले.या यशाबद्दल त्यांचा विद्यापीठातील भाषा प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.ते इंग्रजी विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.सुनील अहिरे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव येथे कॉन्ट्रीब्युटरी टीचर म्हणून अध्यापन करतात.







