जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने ५.६५ दशलक्ष टन मालवाहतूक नोव्हेंबर २०२० मध्ये केली आहे जी नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेल्या ५.५८ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत १.३% वाढ दिसून आली. नागपूर विभागातून डोलोमाइट, कॉटन हस्क, कॉटन बियाणे, कडबा, तांदूळ आणि फ्लाय ॲश, भुसावळ विभागातील हस्क, पुणे विभागातील अॅग्रो आधारित पोटाश अशा नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळविण्यासाठी विभागातील व्यवसाय विकास घटकांनी आक्रमकपणे मार्केटिंग केली आहे.
यावर्षी मध्य रेल्वेकडून ऑटोमोबाईलच्या रेक्सची लोडिंग १५५ पर्यंत पोहोचली आहे. विविध टर्मिनल्समधून बांग्लादेशात वाहनांची निर्यात होणारी वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात यश आले असून, ऑक्टोबर व नोव्हेंबर ३० हून अधिक रेक्सची लोडींग केली गेली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत कांद्याच्या १८२ रॅक्स लोड केल्या गेल्या जी मागील वर्षभरात केलेल्या लोडींग पेक्षा २५ रेक्स नी जास्त आहे. या १८२ रेक्स पैकी ७९ रॅक बांगलादेशात पाठविण्यात आले आहेत.
नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबई विभागाने १,२५२ वॅगन्सची प्रतीदिन अशी सर्वाधिक लोडिंगची नोंद केली आहे. भुसावळ विभागाने ऑक्टोबर २०२० मध्ये एनएमजीची सर्वाधिक २१ गाड्यांची नोंद केली आहे नोव्हेंबर मध्येसुद्धा २१ रॅक्स अशीच ठेवली. किसान रेल हे अजूनही शेतकर्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. किसान रेल्वेच्या आतापर्यंत ४१ ट्रिपमध्ये १३५१३ टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक झाली आहे. जेउर स्टेशन वरून प्रथमच २३ टन केळी भरली गेली. कोविड कालावधीत आतापर्यंत ६४९ पार्सल गाड्या चालविल्या गेल्या आहेत. भिवंडी, पंढरपूर, सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, मोडलिंब, जेऊर, लासलगाव, वरुड ऑरेंज सिटी, काटोल, पांढुर्णा, नरखेड आणि कळमेश्वर स्थानकही पार्सल वाहतुकीला आकर्षीत करत आहे.







