जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील चांदसणी येथील काळभैरव यात्रा आणि भंडारा बंद असल्याची माहिती काळभैरव देवस्थानतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याठिकाणी येऊ नये तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने देखील लावू नयेत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.


सध्या जगभरात करोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांना देखील मर्यादा आले आहेत. काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून चांदसणी काळभैरव देवस्थानच्या वतीने देखील यंदाची १९ डिसेंबर रोजीची यात्रा तसेच काळभैरव जन्मोत्सव आणि भंडारा ७ डिसेंबर रोजीचा हे सर्व रद्द केले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठलीही प्रकारची दुकाने काळभैरव मंदिराच्या परिसरात लावण्यासाठी येऊ नये. तसेच नागरिकांनी देखील गर्दी करू नये असे आवाहन चांदसणी काळभैरव देवस्थानचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिलीप बाविस्कर, उपाध्यक्ष सुरेश भाऊलाल पाटील, सचिव शालिग्राम पाटील यांनी केले आहे. याबाबतची सूचना देखील परिसरात लावण्यात आली आहे.







