नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ दिवसांसाठी भारत लॉकडाउन केला आहे. त्याशिवाय देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव ग्रामीण भागात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे.प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य सेवा वेळेवर पोहचेल. मंगळवारी या प्रोजक्टला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली. पण गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला तयार राहण्याच्या सुचना दिल्याचे एका वृत्तपत्राच्या हवाल्याने देण्यात आले आहे. भारतामध्ये रेल्वेचे जाळे सर्वदूर असून भविष्यात हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामीण भागांतील रूग्णांसाठी याचा फायदा जास्त होईल. ग्रामीण भागांमध्ये महामारी पसरल्यास रेल्वेच्या बोगीचा मेकशिफ्टसारखा वापर करण्यात येणार आहे. जगातील परिस्थिती आणि भारतात करोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहाता गेल्या काही दिवसांपासून सराकारने यावरील उपाय योजानांची तयारी सुरू केली आहे. मोदींनी मंगळवारी (२४ मार्च) देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व रेल्वे सेवांना १४ एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केरळमधील कोच्ची येथे असणाऱ्या फार्मने पंतप्रधान कार्यालायाला या योजनेसाठीचा प्रस्ताव पाठवला.रेल्वेच्या बोगींना रूग्णालयासारखे डिझायन करू शकतो, असा दावा कोच्ची येथील फर्मने केला आहे. फर्मने पंतप्रधान कार्यालायांना पाठवलेल्या पत्रात म्हटले, ‘आमच्याकडे १२,१६७ रेल्वे आहेत. त्यामध्ये २० ते ३० बोगी आहेत. आम्ही त्या सर्वांना मोबाइल हॉस्पिटलमध्ये बदलू शकतो. त्यामध्ये सर्व मेडिकल सुविधांसह आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटर उपलब्ध करून देऊ शकतो. एका बोगींमध्ये १००० बेडची व्यवस्था करू शकतो.’