जळगाव (प्रतिनिधी) – भुसावल मंडळ प्रबंधक कार्यालयात आज दि. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. कर्मचारी लाभ निधि समितीद्वारा भुसावल मंडल मधील पाच दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकलचे वितरण मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता द्वारा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी आर. एच. परदेशी द्वारा करण्यात आले.
याप्रसंगी मंडळ प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनातर्फे नेहमी त्यांच्या वेलफ़ैरसाठी लक्ष दिले जाते व त्याचेच एक पाऊल आजच्या या दिवशी उचलले गेले जेणेकरून दिव्यांग कर्मचारी आत्मनिर्भर होईल व त्यांची कार्यक्षमता वाढेल व त्याचा लाभ प्रशासनाला होईल. याप्रसंगी अप्पर मंडळ प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे, कर्मचारी लाभ समिती सदस्य गजेंद्र ढोले, एस.एस.चौधरी आणि आर.सी.रावत, सर्व कार्मिक अधिकारी, कल्याण निरीक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.