जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कडगाव येथे रूजू असलेल्या ग्रामसेवकाची बदली करू नये, यासाठी जळगाव ग्रामीण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या उपस्थितीत जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घेराव घातला. याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मुरली सपकाळे, प्रमोद घुगे, धनराज जाधव, रविंद्र कोळी, शिवदास कोळी, अशोक कोळी, लताबाई कोळी, सिंधूबाई कोळी, मराबाई कोळी, कौसाबाई कोळी, साधना कोळी, कल्पना कोळी यांच्यासह कडगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.