जळगाव (प्रतिनिधी) – अनु.जमाती व इतर पारंपारिक वन निवासी(वन हक्कांची मान्यता) सनियंत्रण समितीवर आ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांची सदस्य पदी निवड अनु.जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने व कालबद्ध पद्धतीने करण्याकरिता राज्यशासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या उपसचिव या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीवर महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार समितीतून तीन अनुसूचित जमातीचे ३ सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यात आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे या एकमेव महिला सदस्य आहेत.