कासोदा ता एरंडोल – सध्या ठीक ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र 1 डिसेंबर पासून कासोदा येथे सुरू होणार असल्याचे पणन महासंघाचे संचालक संजय पवार भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे कि सध्या कापूस विक्रीचा धडाका शेतकर्यांनी जोरात लावलेला दिसतो कारण की कोरोना महामारी ची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ञांनी वर्तवल्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे त्यामुळे कापूस खरेदी सुरु होतात की नाही होत या संभ्रमावस्थेत शेतकरी असल्यामुळे कासोदा आणि परिसरातील शेतकरी वर्ग खासगीव्यापार्यांना कापूस देऊन मोकळा होत आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एक डिसेंबर किंवा त्या अगोदरही महाराष्ट्र शासनाचे पणन महासंघाचेकापूस खरेदी केंद्र सुरू होऊ शकतात आणि याबाबत शासन विचार करीत असल्याचे ही पणान चे संचालक संजय पवार यांनी सांगितले शेतकऱ्यांकडून व्यापारी वर्ग कमी भावात कापूस खरेदी करून घेत आहेत शेतकऱ्यांनी न घाबरता हमीभाव ५८२५ रुपयाच्या असल्याने पाच-सात दिवस वाट पाहून टप्प्या-टप्प्याने कासोदा येथे सुरू होणाऱ्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस आणून मोजावा कापूस खरेदी केंद्र नियमित सुरू होणार असून शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे आपला चांगला कापूस स्वस्तात विकण्यापेक्षा शासनाच्या हमीभाव केंद्रावर द्यावा असेही आवाहन संजय पवार यांनी केले आहे