रावेर येथिल शेतक-यांचे नुकसान !
रावेर ;– गेल्या तीन दिवसांपासुन शहरात संचारबंदी असल्याने शेतात जाणे न झाल्याने अज्ञातांनी शेतात जाऊन मका व अन्य पिकांचे नुकसान करुन नासधुस केलेली आहे.यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
याबाबत सविस्तर असे की,येथिल प्रगतशिल शेतकरी पुरुषोत्तम नारायण तायडे यांच्या भोकरी शिवारात गट क्रमांक ४५२ मध्ये शेती आहे.संचारबंदी असल्याने चार दिवसांपासुन शेतात जाणे झाले नाही.यामुळे ते दि २६ रोजी शेतात गेले असता संबंधित नासधुस समोर आली.यात त्यांच्या शेतातील एक एकर मधील उभा असलेला मका पिक कापून विहीरित फेकला आहे,तसेच विहीरीमध्ये ठिंबक च्या नळ्या कापुन फेकलेल्या आहेत,वीजपंपावर मोठे दगड फेकून नासधुस केलेली आहे,विहीरीवरील पाईपालाईन खराब करुन लिकेज केले आहे,
तायडे यांच्या शेतात चांगलीच नासधुस केलेली आहे.यांच्यासह शेजारी असलेल्या अनेक शेतक-यांचे ही नुकसान केले आहे.यात लाखो रुपयांचे नुकसानही झालेले आहे.
गेल्या अनेक महीन्यांपासुन या परीसरात भुरट्या चो-या वाढलेल्या असुन पोलिसांनी यावर अंकुश ठेवावा अशी मागणी शेतकरी करत आहे.