अमळनेर (प्रतिनिधी) – येथिल द्रौ.रा.कन्याशाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम पर्यवेक्षीका गरूड यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
त्यावेळी शाळेत नवनियुक्त पर्यवेक्षक सी.एस.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात त्यांनी विद्येविना मती गेली,मतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या ओळींचा अर्थ सांगितला.कार्यक्रमास जोशी, श्याम पवार,मोरे उपस्थित होते.
सुत्रसंचालन दिनेश पालवे यांनी केले.आभार बाविस्कर यांनी मानले.








