यावल तालुक्यातील वढोदा येथील घटना

यावल (प्रतिनिधी) – जळगावात रथ पाहण्यासाठी आलेला २२ वर्षीय तरुण यावल येथे घरी परतत असतांना भरधाव ट्रकने किनगावच्या पुढे वढोदा गावाजवळ त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत सागर उर्फ यश विलास कोळी वय २२ रा.यावल फालक नगर ,नारबा हाँटेलच्या मागे हा तरुण नवीन यामाहा कंपनीची दुचाकी विना नंबरची पासिंग नसलेली घेऊन दि. २६ रोजी जळगावात रथ पाहाण्यासाठी आलेला होता व नातेवाईकांकडे मुक्कामी होता. आज शनिवारी २८ रोजी सायंकाळी ५:३० वाजता यावल येथे येत असतांना किनगावच्या पुढे वढोदा गावाजवळ भरधाव वेगाने चोपडाकडून यावलकडे जाणाऱ्याट्रक क्र. जी.जे. ०३ बी.व्ही. ७३७२ ने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यशचा जळगावला उपचारासाठी नेत असतांना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत सागर उर्फ यशाचा भाऊ धनराज भाऊलाल सोनवणे वय ४३ रा. वढोदा ता.यावल ह्याच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेत घटनेची नोंद केली आहे.







