यावल (प्रतिनिधी) – मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी संस्था उपाध्यक्ष भूषण नागरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी संस्था अध्यक्ष निता गजरे, उपाध्यक्ष भूषण नगरे, सचिव धीरज पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रेश्मा पाटील, मीनल महाजन, पूजा मोरे, साक्षी अग्रवाल, सुनिता वाघ, शारदा पांडव कार्यक्रमाला उपस्थित होते.








