पोलिसांकडून नागरिकांची कसून चौकशी ; अनेकांना लाठीचा प्रसाद तर काहींना उठबशीची शिक्षा
जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात संचारबंदी असली तरी अनेक नागरिक किराणा सामान ,भाजीपाला , औषधी ,दुग्धजन्य पदार्थ तसेच दवाखान्यात तपासणीकरिता जात असल्याचे सांगत शहरासह जिल्ह्यात अनेक जण बाहेर पडताना दिसत असून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही काही कमी होत नसून पुढील चौकात पोलीस दिसताच अन्य मार्गाने धूम ठोकत असल्याचे चित्र दिसून येत आहे .
तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त ठेवला असून प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे . दरम्यान अनेक ठिकाणी टवाळक्या करीत फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद घ्यावा लागत आहे . किराणा माल ,भाजीपाला , औषधी घेण्यासाठी आणि दवाखान्यांमध्ये तपासणीसाठी नागरिक गर्दी करीत असल्याचेही चित्र बघायला मिळत आहे . तसेच शहरातील चित्रा चौक , नेरी नाका , अजिंठा चौफुली या परिसरात शुकशुकाट दिसून आला .कंजरवाडा येथे अवैध दारू विक्री आणि दगडफेक झाल्याच्या अफवेवरून पोलसांनी घटनस्थळी धाव घेतली असता असला कुठलाही प्रकार घडला नसल्याचे आढळून आले . परंतु मेहरूण तलावाजवळील स्मशान भूमी जवळील परिसर आणि रामेश्वर कॉलनी भागात नागरिकांची कसून चौकशी केली जात होती . ग्रामीण भागातील शिरसोली येथे बाजार पट्ट्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना उठाबशाची शिक्षा देण्यात आली . तसेच काठीचा प्रसाद खावा लागला . त्यांच्याकडून गो कोरोना गो कोरोनाच्या घोषणा वदवून घेण्यात आल्या.
———————————-