जळगाव (प्रतिनिधी) – संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, तहसीलदार (महसुल) पंकज लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.