जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नशिराबाद गावाच्या पुढे रस्त्यावर मुंजोबा मंदिराजवळ कार आणि दुचाकी यांच्यात बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान अपघात झाला. यात दुचाकीस्वार दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पुढील माहिती घेण्याचे काम नशिराबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

नशिराबाद गावाच्या पुढे मुंजोबा मंदिराजवळ भरधाव कार मारुती कार क्रमांक एम. एच .19 सी.यू .7525 हिने दुचाकी क्रमांक एम. एच 19 डी.एच. 1020 तिला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. नशिराबाद पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमी मध्ये तुषार मधुकर सोनवणे रा. पिंपरखेड ता.जामनेर याचा समावेश असून दुसऱ्याची माहिती उशिरापर्यंत कळू शकली नव्हती. तसेच कार चालकाची माहिती देखील कळाली नाही. पोलीस उशिरापर्यंत घटनास्थळी होते.याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी गर्दी झाली होती.







