जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथे मोबाइलला लांबविणाऱ्यासह जळगावात दोघांना मारहाण करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यांना संबधित पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
याबाबत किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी पोउनि. रवींद्र गिरासे, विजय पाटील, अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, दिनेश बडगुजर, इद्रिस पठाण, शरद भालेराव, कमलाकर बागुल, रामकृष्ण पाटील अशांचे पथक रवाना केले होते. सिंधी कॉलनी रस्त्यावरील नाथवाडा येथे दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नाथवाडा येथून हिरामण एकनाथ जोशी यास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
तर भुसावळ येथे यावल नाका परिसरात एका व्यक्तीचे लक्ष विचलित करून त्याचा मोबाइलला लांबविल्याप्रकरणी शुभम भीमराव वानखेडे (वय-२४) रा. राहुल नगर, भुसावळ यास ताब्यात घेऊन भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.








