पल्लवी सावकारे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हापरिषदेच्या जलसंधारण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज जिल्हापरिषदेच्या सदस्य पल्लवी सावकारे यांनी जिल्हाधीकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जि. प. च्या जलसंधारण आणि सिंचन विभागात गौण खनिजबाबत झालेल्या भ्रष्टाचाराविषयी आपल्याकडे तक्रार केलेली आहे. त्याबाबत सुनावणी घेण्यात आलेली आहे. परंतु आजवर संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांवर न्यायालय अथवा पोलीस यंत्रणेमार्फत गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे.







