जळगाव (प्रतिनिधी) – येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्या आवारात विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. गुरुवारी २६ रोजी एकदिवसीय संपात तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
यावेळी बीएसएनएल कर्मचारी संघटना, आखिल भारतीय बीएसएनएल डॉट पेंशनर्स असोसिएशन यांच्यासह इतर संघटनांनी मागण्या केल्या आहेत की, बीएसएनएलची फोरजी सेवा त्वरित सुरु करा. खाजगी / विदेशी कंपनी म्हणून कोणताही भेदभाव न करता बीएसएनएलला सुद्धा उपकरणे खरेदी करण्यास परवानगी दयावी., तिसरा वेतन पुनर्निरीक्षण निश्चित करा,कामांच्या अंधाधुंद आउटसोर्सिंगद्वारे कंत्राट थांबवा. कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना परत घ्या. त्यांच्या वेतनाची थकबाकी त्वरित द्या. १ जानेवारी २०१७ पासून निवृतीवेतनाचे पुनरावलोकन करा.,नॉन एक्सिकेटीव्ह कर्मचारी यांच्यासाठी नवीन प्रमोशन पॉलिसी लागू करा., कोविडमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना १० लाख रुपये भरपाई द्या आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी समन्वयक निलेश काळे, बी. पी. सैंदाणे, शशिकांत सोनवणे, विकास बोंडे, विलास डिकोंडा, सी. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष एम. डी. बढे, अरुण इंगळे आदी पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी, निदर्शना वेळी उपस्थित होते.







