जळगाव (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा जळगाव यांच्या वतीने प्रतिमा पूजन व व्याख्यान असा छोटेखानी कार्यक्रम आयोजीत केला होता .
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश मोरे , शंभु पाटील ,संदीप
पाटील , गजानन वाघ व इतर सदस्य उपस्थित होते .
या प्रसंगी शंभु पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडला. कोविडमुळे जाहीर कार्यक्रम न करता अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला .