शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांना ” इनोव्हेशन अँड लीडरशिप अवार्ड “
जळगाव (प्रतिनिधी) –जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांना नुकतेच ऑनलाईन झालेल्या राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.शिक्षण क्षेत्रात कोरोना काळात राबवलेल्या नवोपक्रम पुरस्कार स्पर्धेत विजय पवार यांनी सहभाग नोंदविला होता.
शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या श्री अरविंदो सोसायटी दिल्ली तर्फे आयोजित “नॅशनल कॉन्फरंस – शून्य से सशक्तीकरण ” या कार्यक्रमात श्री विजय पवार यांना “इनोव्हेशन अँड. लीडरशिप केसबुक कोविड एडिशन ” पुरस्कार जाहीर करण्यात आला.
त्यांनी कोविड काळात जळगाव जिल्ह्यातील विदयार्थी व शिक्षकांसाठी राबविलेल्या डिजिटल बुक, ऑनलाईन वेबिनार, वुई लर्न इंग्लिश कार्यक्रम, क्रिएटिव्ह टीचर्स क्लब फेसबुक पेज इत्यादी उपक्रमांची दखल घेऊन त्याची नोंद कोविड एडिशन हँडबुकमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शिक्षणाधिकारी बी. एस. अकालाडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. डी.एम. देवांग, सतीश चौधरी, राजेंद्र सपकाळे यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.कॉन्फरन्समध्ये विविध राज्यातील उच्च स्तरीय अधिकारी, शिक्षक तसेच एचडीएफसी बँक प्रतिनिधी नुसरत पठाण,कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल, केम्ब्रिज विदयापीठ प्रतिनिधी नितीन भल्ला आदी उपस्थित होते.