अमळनेर (प्रतिनिधी) – फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकतर्फे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते बचत गटाचे कर्ज घेतलेल्या महिलांना उंबरखेड येथे व्यवसाईक सामाजिक जबाबदारी CSR मधून निःशुल्क किराणा वाटप करण्यात आला, यावेळी मंगेश दादा यांनी बँकिंग क्षेत्रातील CIBIL चे किती महत्व समजून सांगितले, स्वतः मंगेश दादा यांनी बँकिंग क्षेत्रात काम केले असल्याने त्यांनी फिनकेयर बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यात ही असे चांगले काम करत रहा म्हणून शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश बोरसे, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील, कैलास पाटील, व उंबरखेड येथील प्रवीण पाटील, रामचंद पाटील, हर्षल पाटील व चाळीसगाव शाखेचे विभागीय व्यवस्थापक सुरेश बाला, शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर मोरे उपस्थित होते व कर्मचारी रविराज रमैय्या, नारायण गुरव, भरत माळी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







