मनवेल परिरातील नदीपात्र झाले जलमय
नागरिक झाले आवाक!
यावल (प्रतिनिधी) – सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असताना आज दि.२४ सकाळच्या दरम्यान मनवेल परिसरातून वाहणार्या भोनस नदीला अचानक मध्ये पूर आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भिती व्यक्त केली जात होती. या अचानक आलेल्या पुरामुळे मनवेल परिसरातील भोनक नदी पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे.एकूणात हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी नागरीकांनी हातनुर परिसरात पाहणी केल्या असताना काही वेगळेच आढळून आले आहे .साकळी- पिळोदा रस्त्यावर असलेल्या हातनूर पाटचारी जवळ पाटातून पाणी सोडण्याचे ठिकाण असून छोटे गेट उचलण्यासाठी त्या ठिकाणी फिरते चाक आहे . मात्र काल दि . २३ रोजी संध्याकाळच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी या गेटचे चाक फिरून ठेवलेले होते असे दिसून आलेले आहे. त्यानंतर दि . २३ रोजीच रात्रीच्या पाटाला पाणी सोडल्याने या गेटमधून संपूर्ण पाणी नदीमधून वाहून निघाले . अचानक आलेल्या पुरामुळे मनवेल परिसरातील अनेक मजूर, शेतकरी यांची तारांबळ उडाली .
सकाळी शेतकरी व शेतमजुरांची कामासाठी शेतात जात असताना अचानक नदीला आलेल्या पुरामुळे ताराबंळ उडाली.
पाट बंधारे विभागाचे दुर्लक्ष
साकळी येथून जवळच असलेल्या पाटचारी येथे कर्मचाऱ्याची गरज आहे. येथे कोणीही लक्ष द्यायला नसल्याने शासनाचे खूप मोठे नुकसान होत आहे. पाटचारीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे लावण्यात आले होते. त्यावरील लोखंडी कठडे हे लोखंडी पाईपचे असून ते चोरीला जात आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही नसल्याने चोरांचा जोरदार धुमाकूळ सुरु आहे. दररोज कठड्यावरील एक एक लोखंडी पाईप चोरीला जात आहे. असे करता करता संपूर्ण कठडा एका बाजूने गायबच झाला असे म्हणावे लागेल. त्वरित पाट विभागाने होणाऱ्या नुकासानाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आ







