वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. नागरिक घरात असल्याने सर्वांची काम बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे यासाठी काल दिनांक २३ रोजी भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण वतीने ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,चोपडा समोर विजबिल जाळून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ वीज बिले माफ करावी. अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेवून सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल,लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच विज कंपन्यांकडून नागरीकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत.त्यामुळे सरकारने विजबिले तात्काळ माफ करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले ,दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी.
यांवेळी चोपडा ग्रामीण तालुकाध्यक्ष पंकज पाटील , शहराध्यक्ष श्री.गजेंद्र जैसवाल, माजी सभापती आत्माराम भाऊ माळके,
सौ.प्रतिभा पाटील,सौ.पल्लवी भिल्ल,जि.यु.मो.उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,तालुका यु.मो.अध्यक्ष प्रकाश पाटील,शहर यु.मो.अध्यक्ष तुषार पाठक,धनंजय पाटील, सर,तालुका सरचिटणीस हनुमंराव महाजन,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजना नेवे,जेष्ठ नेत्या कमलताई चौधरी,उपाध्यक्षा सौ.माधुरी अहिरराव,सौ.रजना मराठे,सौ.आरती माळी सौ.अनिता नेवे संवाद संयोजक भरत सोनगिरे,शहर सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर, देविदास पाटील संजय श्रावणी,गोपाल पाटील,तिलक काका शहा,डाॅ.विक्की,डाॅ.आशिष पाटील,संभाजी पाटील,विवेक गुर्जर, कार्यालय मंत्री मोहित भावे,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







