अमोल वैद्य उपोषणाला बसणार
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – शासनाद्वारा दर महिन्याला गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून देण्यात येते परंतु मुक्ताईनगर तालुक्यातील बावीस स्वस्त धान्य दुकानांमधील हजारो लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे धान्य मिळालेले नाही त्यामुळे ते धान्य अक्षरशहा सडण्याच्या मार्गावर आहे सदरचे धान्य लाभार्थ्यांना उपलब्ध न झाल्यास त्याच्या निषेधार्थ अमोल वैद्य हे 27 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेसाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून कमी दरात दरमहा धान्य पुरवले जाते. परंतु मुक्ताईनगर तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील 22 स्वस्त धान्य दुकानात मधील हजारो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. याला जबाबदार जिल्हा पुरवठा विभाग व तालुका प्रशासन असल्याने त्यांच्या या गलथान कारभारामुळे हजारो लाभार्थ्यांचे धान्य गेल्या चार महिन्यापासून अक्षरशः सडण्याच्या मार्गावर आहे.
यासंदर्भात मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहे. त्यावर तालुका प्रशासन व जिल्हा पुरवठा अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. हे धान्य असले तरी चालेल पण आम्ही या धान्याचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी होऊ देणार नाही, अशी प्रशासनाची भूमिका अतिशय निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मुक्ताईनगर येथील अमोल वैद्य हे येत्या 27 नोव्हेंबर पासून मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याच्या इशार्याचे निवेदन देण्यात आले आहे.







