पारोळा (प्रतिनिधी) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी सोमवारी जनता कर्फ्युचे आवाहान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दि,२३ सोमवार रोजी पारोळा शहरातील व्यापाऱ्यांनी पुर्ण साथ देत पारोळा शहर हे शंभर टक्के बंद ठेऊन शासनाच्या निर्देशनाचे पालन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथे शनिवारी दि. २१ रोजी आमदार चिमणराव पाटील व प्रशासकिय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत बैठक होऊन संभाव्य
अत्यावश्यक सेवा जसे कि मेडीकल, कृषी केंद्र, दुध डेअरी या सेवा वगळता शहरातील दुकानदांरानी आप आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यु यशस्वी करत. पारोळा शहर संपुर्ण शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते. शहरासह माहामार्गावरील ही हाॅटेल्स दुकाने ही बंद ठेऊन सहकार्य केले. या बंदचे पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय यांनी स्वागत करित व्यापाऱ्यानी दाखवलेली एकते मुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले व सर्व व्यापारी मंडळी चे आभार व्यक्त केले.







