शिरपूर / पारोळा (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील होलनांन्थे येथील आर. आर. खंडेलवाल खंडेलवाल विद्यालयातील सन २०००/२००१ च्या १० वी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत नुकताच श्रीक्षेत्र नागेश्वर येथे स्नेह मेळावा पार पाडला.
बॅच मधील दिपक राजपूत यांनी कोरोना सेंटर ,शिंगावे ता. शिरपूर येथे डॉ. मनोज पाटील यांनी होळनांथे येथे स्वतःच्या रुग्णालयात तर अंजना राजपूत यांनी साने गुरुजी रुग्णालय पुणे येथे परिचारिका म्हणून कोविड ग्रस्त रुग्णांची सेवा केली आहे.आपल्या जिवाची पर्वा न करता व सामाजिक कार्याचे दातृत्व स्वीकारून कोविडग्रस्त रुग्णांची सेवा केल्याबद्दल स्नेह मेळाव्यात दिपक राजपूत, डॉ. मनोज पाटील आणि अंजना राजपूत यांचा “कोरोना योद्धा” म्हणून सम्मान करण्यात आला.
ऐन कडक निर्बंध असलेल्या कोरोना काळात याच बॅच मधील मुलं / मुलींनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत गोरगरिबांना मोफत अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप करून मदतीचा हात दिला होता. अजून या पुढे जात कै. महावीर जैन आपत्कालीन मदत योजना राबवून बॅच मधील गरजू बांधवाना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे कार्यकारी प्रमुख प्रदीप पवार यांनी सांगितले.
यावेळी स्नेहमेळाव्यात प्रदीप पवार, किशोर राजपूत, संदीप सोनवणे, अमित कुलकर्णी, आशा पाटील, ज्योती पारेख, राहुल चौधरी, संदीप पवार तसेच पत्रकार जितेंद्र वानखेडे यांच्यासह इतर वर्ग मित्र उपस्थित होते.








