आमदार चिमणराव पाटील व प्रांत. विनय गोसावी यांना दिले निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई देतांना पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर नुकसान भरपाई म्हणून पक्षपातीपणा करण्यात आला आहे, तर सौर ऊर्जा पंप सबसिडीतून पारोळा तालुक्याला जाणूनबुजून वगळण्यात आले आहे.
वेळोवेळी शेतकरी संघटनेच्या / विविध माध्यमातून निवेदन देऊन सुध्दा मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या समस्याची दखल घेण्यास तयार नाही, म्हणून आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 11 वाजता स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बंधूनी एकत्र येत तहसील कार्यालय समोर डॉ. पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर पाटील शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पार पाडले.
तालुक्याचा सौर कृषी पंप योजनेत समावेश करण्यात यावा, दुष्काळी मदत देण्यात यावी, पीक विमा मंजूर करण्यात यावा यासारख्या इतर मागण्या मंजूर करण्यात याव्यात असे निवेदनात नमूद करून आमदार चिमणराव पाटील व प्रांत विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
सदर उपोषणाला भीम आर्मी सामाजिक संघटना व अखिल भारतीय छावा संघटना पारोळा ,माहिती सेवा समिती यांनी पाठिंबा देत पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
यावेळी डॉक्टर पृथ्वीराज पाटील ,किशोर पाटील, सुनील देवरे, भिकनराव, पाटील, संजय वाल्हे, भुषण पाटील, जितेंद्र वानखेडे, भाऊसाहेब सोनवणे, राहुल साहेबराव पाटील, उमेश पाटील, खुशाल श्रावण, भुषण पाटील, पंकज पाटील, म्हसवे नाना पाटील, मनोहर केदार, सचिन पाटील, रावसाहेब भोसले, हरेश चव्हाण, संदीप पाटील, भूषण माने, नवल पाटील, नितीन देसले, नीलेश चौधरी, गणेश पाटील, गुलाब पाटील, भरत सिंह राजपूत, प्रमोद पाटील, सतीश पाटील, रवींद्र पाटील, शेतकरी उपस्थित होते. जि.प.सदस्य डॉ. हर्षल माने यांनी उपोषण स्थळी भेट देत शेतकरी संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या.







