जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे, भुसावळ विभागामध्ये वयाच्या 101 वर्षात पदार्पण केलेले निवृत्तीवेतनधारक श्री. केशव नरहर बापट यांना माननीय मंडळ रेलवे प्रबंधक श्री.विवेक कुमार गुप्ता यांच्याद्वारे प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

श्री केशव नरहर बापट हे रेल्वे मधे गार्ड या पदावर कार्यरत होते. ते सन 1978 रोजी रेल्वे सेवेतून निवृत्त झालेले होते. त्यांनी आपल्या वयाची 100 वर्ष आज दिनाक 21.11.2020 रोजी पूर्ण केली आहेत. आणि आज पासून त्यांना 100% पेन्शन मध्ये वाढ झाली आहे .







