जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे आज २१ नोव्हेंबर रोजी सकाळी आकाशवाणी केंद्रामागील एका शेतात चिठ्ठी लिहून रवींद्र यशवंत उर्फ कडू वाघ (वय ४०) याने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 9 वाजता उघडकीस आली आहे. त्याने चिठ्ठी लिहिली असून नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.


शिरसोली प्र.न.येथिल रवींद्र यशवंत उर्फ कडू वाघ (वय ४०) हा काल २० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या पासून घरातून बाहेर शौचास गेला होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली होती. आज सकाळी ९ वाजता शिरसोली प्र.न. गावालगत आकाशवाणी केंद्राच्या मागील गट न.६०८ भागवत रामदास ताडे यांच्या मालकीच्या शेतात बंटी गोपाल ताडे हा आलेला असता यावेळी त्याला विहिरीत रवींद्र वाघ हा तरंगताना दिसला. यावेळी बंटी याने सदर घटना शेतमालक भागवत ताडे याला सांगितले. शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. तात्काळ घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे राजेंद्र ठाकरे , निलेश भावसार दाखल झाले. रवींद्र वाघ यांच्या पश्चात पत्नी, ६ वर्षाचा दिपक हा मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी रवींद्रने लिहून ठेवली चिठ्ठी
दादा आई मला माफ करा. सुमीत्रा, दिपक बेटा आय लव्ह यु. मी तुमच्यावर फार प्रेम करतो. परंतु माझा पाय मला साथ देत नव्हता. मी हरलो. सर्वांची माफी मागतो आणि माझी जीवन यात्रा कट करतो. तुमचा सर्वांचा रवी. असे लिहिले आहे.
दोन वर्षात याच विहिरीत तीसरी आत्महत्या
शिरसोली प्र.न. गावालगत आकाशवाणी केंद्राच्या मागच्या बाजुला भागवत रामदास ताडे याच्या मालकीच्या शेतातील विहिरीत दोन वर्षात ही तीसरी आत्महत्या झाली असल्याचे बोलले जात आहे. शेताला तार कंपाउंड केले असुन सुध्दा आत्महत्या झाली. विहिरीवर लवकरच तारेची जाळी बसविण्यात येईल असे शेत मालक भागवत ताडे यांनी “केसरीराज”शी बोलताना सांगितले.








