जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री तथा भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांचा तपासणीनंतर कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपचारासाठी ते मुंबईला रवाना होत आहे. याबाबत खडसे यांनी स्वतः ” केसरीराज” शी बोलतांना दिली.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे व त्यांची मुलगी सारा हिला कोरोनाची लागण झाली होती. ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या दोन्ही मुलांनाही कोरोना झाल्यामुळे ते होम कोरोनटाईन आहे. आता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते उपचारासाठी आज मुंबईला रवाना होत असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. तसेच एकनाथराव खडसे यांनी माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी तसेच कुणीही मी बरा झाल्याशिवाय भेटीला येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.








