जळगवसह जिल्ह्यात सर्वत्र सामसूम ; पोलीस बंदोबस्त चोख
जळगाव ;- संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावर अनेक नागरिकांनी मंगळवारी मोठ्या प्रमणावर गर्दी केल्याने राज्यातील परिस्थितीला लोक गांभीर्याने घेत नसल्याने सरकारला कठोर पाऊले उचलावी लागली होती . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली होती . त्यामुळे आता ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद खावा लागला . मोजक्या अत्यावश्यक सेवांसाठी जाणाऱ्या व्यक्तींनाच जाऊ दिले जात होते. त्यामुळे दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वत्र सामसूम आणि चौकाचौकात पोलिसांनाचा बंदोबस्थ असल्याचे चित्र दिसून येत होते . एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील वावडदा , शिरसोली , म्हसावद येथे नियम मोडणाऱ्यायांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला .तसेच पेट्रोल भरण्यासाठी,भाजीपाला ,औषधी , किराणा माल घेण्यासाठी अनेकांची पाऊले घरातून पडली होती . मात्र काहींकडे ओळखपत्र अथवा ठोस पुरावा नसल्याने त्यांना आल्या पावली घरी परतावे लागत होते . तसेच अनेकांनी पोलिसांच्या धास्तीने घराबाहेर पडणे टाळल्याने जिल्ह्यात सर्वत्र शांतता आढळून आली . तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे .