जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना शहर शाखेतर्फे आज सकाळी दहा वाजता बस स्टँड येथे भगवा ध्वजच्या ठिकाणी तसेच शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, गण प्रमुख अजय जाधव, शहर प्रमुख सुकलाल बारी, रवींद्र पांढरे, भाऊराव गोंधनखेडे, रमेश बनकर, रंगनाथ महाराज, संजय तायडे, संजय थोरात, संजय पांढरे, पुंडलिक भडांगे, दगडू पाटील, ग्रा.प.सदस्य शरद पांढरे, रवींद्र मोरे, सलीम शहा, विकास जाधव, विकास चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.