जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील परिवर्तन चौकामध्ये एनएसयुआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या हातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
देशातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता संपूर्ण देशामध्ये जाती-जाती व धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.स्व. बाळासाहेब ठाकरे यांची समाजाला नेहमी शिकवण होती की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करावे. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला. कधीही कुठल्याही जाती धर्माचा द्वेष बाळासाहेबांनी केला नाही. बाळासाहेबांचा विरोध हा समाजातील विकृतीला होता, ती विकृती नष्ट करण्याच काम व त्याविरुद्ध लढा देण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केला. बाळासाहेबांची शिकवण आमलात आणण्याची आजच्या राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना फार गरजेचे झाले आहे. त्यामुळेच आज आवर्जून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत मांडले.
याप्रसंगी जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईल खान, उपाध्यक्ष दिनकर भालेराव, मागास वर्ग जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, शकुर जामदार , यासिन खान,वाय सी चौधरी,सुरेश भोलाने, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, शकील आझाद,निखिल चौधरी,आनंद कोळी, माजी युवक अध्यक्ष अतुल जावरे,निसार अली, अँड. कुणाल गवई आदि उपस्थित होते.