जळगाव (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे व स्टॉल धारक संघटना यांच्यातर्फे वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित रोटरी स्टार अध्यक्ष धनराज कासट, जिनल जैन, सागर मुंदडा, अश्विन मंडोरा, नीरज अग्रवाल, स्टॉल धारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक, शरद पाटील, पराग जगताप, विनोद नेवे, सुरेंद्र मेहता, ज्ञानेश्वर सोनार, कृष्णा मुळीक, नरेंद्र नेरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास आर्थिक सहकार्य गोपाल कासट यांनी केले.