जळगाव (प्रतिनिधी) – पत्नीविरह सहन न झाल्यामुळे एका पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पत्नीचा विष प्राशनाने मृत्यू झाल्या नंतर त्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना मंगळवारी 17 रोजी जळगावात घडली आहे.

विशेष गोष्ट म्हणजे त्याने आत्महत्येआधी फेसबुक लाईव्ह करून याची माहिती जगाला दिली आहे. शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज मंगळवारी रूळांवर आढळून आला.
आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. तर आई-वडिलांसह कुटुंबियांचा निरोप घेत त्याने हे लाईव्ह केले आहे. यानंतर त्याने आत्महत्या केली. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे.







