यावल तालुक्यातील निमगाव जवळील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील निमगाव जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान पठान यांचे जेष्ठ बंधु इसहाक खान समशेर खान (वय ७२ रा. आझादनगर भुसावळ) हे यावल येथे रविवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी एका साखरपुडयाच्या कार्यक्रमास पत्नी जुलैखा अन्जुम (वय ६५) वर्ष यांच्यासोबत आलेले होते. हा कार्यक्रम आटोपुन ते आज दि.१६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळ येथे घरी जात होते. तर भुसावळकडुन येणारी कार क्रमांक एम.एच. ०३ डी.एच ५८२७ या वाहनाने निमगाव जवळ त्यांच्या दुचाकी एम.एच. १९ ए.एफ. ५०९४ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात त्यांचा मृत्यु झाला असुन, त्यांच्या पत्नी जुलैखाबी अन्जुम या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये मुलगा नाजीम खान इसहाक खान यांनी फिर्याद दिल्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.







