आठ तालुक्यांमध्ये कोरोना निरंक

जळगाव (प्रतिनिधी) – आज शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३३ आढळली असुन दिवसभरात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७३० झाली आहे. त्यापैकी ५२०३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४२२ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ५२ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९६.८४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३७ टक्क्यांवर आलेला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १९, भुसावळ-२, चोपडा-३, जामनेर-३, रावेर-२, चाळीसगाव-३ आणि मुक्ताईनगर-१ असे एकुण ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा आणि बोदवड या तालुक्यात निरंक दिसून आले आहे.







